वारंवार दूध ऊतु जातं ? तर हे करून बघा

शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (10:48 IST)
असे बर्‍याच वेळा होत की आमचे लक्ष्य थोडेही इतके तिकडे झाले की गॅसवर गरम करायला ठेवलेले दूध भांड्यातून उतू व्हायला लागत. या समस्येपासून वाचण्यासाठी काही उपाय आहेत. 
 
आपण ज्या भांड्यात दूध गरम करत आहे त्या भांड्याच्या कोपर्‍यात थोडेसे बटर लावून द्या, आता दूध कितीही तापले तरी ते भांड्याच्या बाहेर येणार नाही.
 
दुधाच्या भांड्यात दूध काढण्याआधी जरा पाणी टाकावं आणि मध्यम आचेवर तापवल्याने दूध ऊतु जात नाही.
 
दुधात उकळी येताना भांड्याला हालवल्याने देखील दूध उकळून बाहेर पडत नाही.
 
दुधावर फेस येत असताना काही थेंब पाण्याने शिंपडल्याने दूध बाहेर ऊतु येत नाही.
 
दुधाच्या भांड्यात लाकडाचा चमचा टाकून ठेवल्याने दूध ऊतु जात नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती