घरातील स्त्रिया अनेकदा बटाटे आणि कांदे यांसारख्या भाज्या जास्त खरेदी करतात आणि स्वयंपाकघरात ठेवतात. कारण हे दोन्ही घटक जवळपास प्रत्येक भाजीत बनवण्यासाठी वापरले जातात. पण काही वेळा स्वयंपाकघरात ठेवलेल्या कांद्यांना कोंब येतो जर तुमच्यासोबतही असे होत असेल, तर कांद्याला कोंब येण्यापासून रोखण्यासाठी या सोप्या आणि प्रभावी किचन हॅकचे अवलंब करा.
कांद्याला कोंब फुटण्यापासून दूर ठेवण्यासाठी टिप्स -
1 कांदा इतर भाज्यांसोबत ठेवू नका - अनेकदा बरेच लोक बटाटा-कांदा, लसूण-आले इत्यादी भाज्या एकत्र ठेवतात.आपण देखील अशी चूक करत असाल तर असे करणे टाळा. वास्तविक, अनेक भाज्यांमध्ये इथाइलीन नावाचे रसायन असते, ज्यामुळे कांद्याला कोंब येतात. याशिवाय कांदे फळांमध्ये मिसळून कधीही ठेवू नयेत.
3 फ्रीजमध्ये ठेवू नका -अनेक वेळा लोक कांदा साठवण्यासाठी फ्रीजचा वापर करू लागतात.आपण ही असेच काही करत असाल तर अशी चूक करू नका. फ्रीजमध्ये ठेवलेल्या बाकीच्या गोष्टींमुळे कांद्याला लवकर कोंब येतो. इतकंच नाही तर काही वेळा कांद्याला फ्रीजमध्ये ठेवल्याने शुगर लेबल वाढते, ज्यामुळे कांदा लवकर फुटतो.