Cooking Tips : चविष्ट सूप बनवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

बुधवार, 7 डिसेंबर 2022 (22:24 IST)
आपल्या सर्वांना सूप खायला आवडते. विशेषत: थंड वातावरणात जेव्हा तुम्हाला काहीतरी गरम प्यावेसे वाटते तेव्हा सूप पिणे नक्कीच चांगली कल्पना आहे. सहसा, घरी सूप बनवताना, ते इतके स्वादिष्ट दिसत नाही. अशा परिस्थितीत आपण एकतर बाहेरून सूप मागवतो किंवा घरीच पॅकेटआणून सूप बनवतो.  घरच्या घरी चविष्ट सूप बनविण्यासाठी या सोप्या टिप्स अवलंबवा.
 
1  भाज्या परतून घ्या-
साधारणपणे सूप बनवताना ते उकळून आणि थेट भाज्या ब्लेंड करून बनवले जाते. जर तुम्हाला सूपमधील सर्व भाज्यांची चव चांगली मिळवायची असेल तर त्यांना हलकेच परतून घेणे चांगले आहे. लसूण, कांदा, गाजर परतून सूप बनवलं तर त्यांचा सुवासही सूपमध्ये येतो.भाज्यांना परतल्यावर भाज्या किंचित मऊ होतात कारण भाज्या मऊ असतात तेव्हाच त्यांचा पूर्ण स्वाद मिळतो.
 
2 ताज्या हर्ब्सचा समावेश करा
सूप अधिक चविष्ट बनवण्याचा हा देखील एक मार्ग आहे. सूप बनवताना तुम्ही त्याची संपूर्ण रेसिपी फॉलो करा.सूप बनवताना रेसिपीमध्ये पार्सले, रोझमेरी किंवा थायम इत्यादी घातल्याने त्याची चव अनेक पटींनी वाढते. लक्षात ठेवा की आपण या हर्ब्स शेवटी वापरा जेणेकरून त्याची चव येईल.
 
3 ताज्या भाज्या वापरा-
अनेकदा भाजी शिळी झाली की लोक त्यापासून सूप बनवतात.जरी ही या मुळे भाजीचा वापर नक्कीच चांगला होतो. पण अशा भाज्यांचे सूप बनवताना प्रत्यक्षात जी चव मिळायला हवी ती मिळत नाही. अशा परिस्थितीत सूप बनवताना फक्त ताज्या भाज्या वापरण्याचा प्रयत्न करा.  
 
4 रेसिपीच्या शेवटी ऍसिडिक घटक समाविष्ट करा
सूप आणखी रुचकर बनवण्यासाठी सूप बनवल्यानंतर शेवटी लिंबाचा रस आणि व्हिनेगर यांसारखे आम्लयुक्त घटक वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याची चव  आणखी चांगली होईल. लक्षात ठेवा की क्रीमबेस्ड सूपवर हे लागू होत नाही.
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती