Flour Dough : अनेक महिला गव्हाचे पीठ मळल्यानंतर फ्रीजमध्ये ठेऊन देतात. मळलेले गव्हाचे पीठ खराब होऊ नये म्हणून फ्रीज हा एक चांगला पर्याय मानला जातो. आपण याला 3 ते 4 दिवस फ्रिज मध्ये ठेऊ शकतो. पण फ्रीजमध्ये ठेवल्या नंतर ही मळलेले पीठ हे खराब होते. या समस्येवर उपाय म्हणून मळलेले पीठ जास्त दिवस ठेवण्यासाठी काही टिप्स वापरल्या तर मळलेले पीठ हे अनेक दिवस ताजे आणि मऊ राहील.
आपल्याला नेहमी सल्ला दिला जातो की, खाण्याचे पदार्थ जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेऊ नये . पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात हे कधी कधी संभव असते. जर घरातील सर्वच लोक नोकरदार असतील तर ते खायच्या काही वस्तु बनवून फ्रिज मध्ये ठेऊन देतात. म्हणून फ्रीजमध्ये मळलेले पीठ जेव्हा पण ठेवाल तेव्हा ते एका बंद हवेच्या डब्ब्यात ठेवावे. यामुळे मळलेले पीठ हे ताजे राहील.
फ्रीजमध्ये मळलेले पीठ ठेवतांना ते एल्यूमिनियम फॉयल मध्ये व्यवस्थित बांधून बंद हवेच्या डब्ब्यात ठेवावे. यामुळे मळलेल्या पिठात बॅक्टेरिया निर्माण होणार नाही व पीठ ताजे राहील. तसेच पीठ मळतांना त्यात कोमट पाणी घालावे. यामुळे पीठ मऊ राहील . फ्रीजमध्ये मळलेले पीठ ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्यावी व अवलंबवावी. जे आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे.