भांडी चकचकीत करण्यासाठी 5 सोपे उपाय

भांडी चकचकीत असले की जेवण बनवायला मजा येतो. हल्ली भांडी घासण्याचे बार आणि लिक्विड सोपच्या एवढ्या जाहिराती येतात की भांडी अगदी चकचकीत न झाल्याशिवाय वारंवार कंपनी बदलण्यात येते. पण त्याने  इतका फरक पडणार नाही जेवढा हे उपाय करून पडू शकतो. बघू या काही सोपे उपाय: 
* जेवण झाल्यावर भांडी लगेच एकदा पाण्याने धुऊन टाकावी. मग सिंकमध्ये ठेवावी. याने त्यावर खरकटंही चिकटून राहत नाही आणि बॅक्‍टीरिया पसरण्याचा धोका कमी होतो.
 
* भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणारा स्पंज आधी धुऊन टाकावा. यावर आधीपासून अनेक बॅक्‍टीरिया चिकटलेले असतात. वेळोवेळी हा स्पंज बदलत राहावा.

* भांडी स्वच्छ केल्यानंतर त्यांना केमिकल सॅनिटाइजरमध्ये बुडवून ठेवा, कारण साधारण साबणाने चिकटपणा तर निघून जातो पण बॅक्टीरिया मरत नाही.
 
* भांडी धुण्यासाठी गरम पाणी वापरा, विशेषतः काचेचे. याने त्यावरील ग्रीस आणि घाण आरामात स्वच्छ होते.
 
* भांडी घासण्याची प्रक्रिया तीन स्टेप्समध्ये पूर्ण केली पाहिजे: पहिल्या चरणामध्ये पाण्यात साबण मिसळून भांडी धुवावी. दुसर्‍या चरणात भांडी स्वच्छ पाण्याने साफ करावी आणि तिसर्‍या चरणात केमिकल सॅनिटाइजरने भांडी संसर्गापासून मुक्त करावी.

वेबदुनिया वर वाचा