घराच्या घरीच तयार करा लोणी

आमच्यातील जास्त करून लोक बाजारातून लोणी विकत घेतात. पण बाजारातून आणलेले लोणी आणि घरात तयार केलेल्या लोणीत फार फरक असतो. घरात तयार केलेले लोणी जास्त स्वादिष्ट आणि पोषणाने भरपूर असत. बाजारात विकणारे लोणी भेसळ देखील असू शकत.  अशात थोडीशी मेहनत करून आणि थोडा वेळ देऊन तुम्ही घरच्या घरीच फ्रेश आणि जास्त टेस्टी लोणी तयार करू शकता. 
 
घरी लोणी तयार करण्यासाठी काही टिप्स देण्यात येत आहे :
 
1. प्रत्येक दिवशी दुधावरची साय काढून एका स्वच्छ भांड्यात ठेवत जा.  भांड्याला बाहेर ठेवू नये. याला फ्रीजमध्येच ठेवा.  
 
2. जेव्हा भांड्यात भरपूर साय जमा होईल तेव्हा दोन चमचे दही घालून रात्रभर फ्रीजमधून बाहेर ठेवा.  
 
3. सकाळी किमान एक ग्लास फ्रीजचे गार पाणी त्या सायीवर घालून त्याला रवीने घुसळून घ्या किंवा मिक्सरमधून काढून घ्या.  
 
4. या सयीला तोपर्यंत मिक्सरमधून फिरवा जेव्हापर्यंत ताक (छाछ) आणि लोणी वेगळे वेगळे होत नाही.  
 
5. नाही वेळाने वरच्या भागावर लोणी दिसू लागेल.   
 
6. लोण्याला चमच्याने काढून एका वेगळ्या भांड्यात ठेवा.  
 
7. लोण्याला एअर टाइट डब्यात ठेवा. याला तुम्ही एक ते दोन आठवडे वापरू शकता.  किंवा घरच तूप वापरायचे असेल तर या लोणीला गरम करून घ्या आणि घरच्या चविष्ट तुपाची गोष्टच वेगळी आहे.

वेबदुनिया वर वाचा