दोन मित्रांची कथा : हत्ती आणि ससा

सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (17:02 IST)
एका जंगलात नंदू नावाचा हत्ती रहात होता. चिंटू नावाचा ससा त्याचा मित्र होता. ते दोघे जिवलग मित्र होते. ते जंगलात एकत्र फिरायचे.त्यांची मैत्री संपूर्ण जंगलात प्रख्यात होती. एके दिवशी हवामान खूप छान होते,आनंददायी आणि आल्हाददायक वातावरण होते.हिरवे गवत सर्वत्र पसरले होते. झाडांवर कोवळे पाने आले होते. हत्ती आणि ससा पोटभरून जेवले आणि दोघे विश्रांती घेत असताना त्यांनी विचार केला की आपण एक खेळ खेळू या. 
 
त्यांना काही नवीन खेळ खेळायचे होते. यावर नंदू हत्ती म्हणाला की आपण एखादा नवीन खेळ खेळू या.जो जुन्या खेळा पेक्षा चांगला असेल. 
आणि तो खेळ असा असेल की आधी मी खाली बसेन नंतर  तू माझ्यावर उडी मारून दुसऱ्या बाजूला जा नंतर तू खाली बसशील मग मी तुझ्यावरून उडी मारेन. पण या खेळात एकमेकांना स्पर्श करायचा नाही. 
 
चिंटू ससा मनातल्या मनात घाबरत होता.परंतु मित्राचे मन मोडू शकत नव्हता.तो हे खेळ खेळण्यास तयार झाला. 
 
सर्वप्रथम हत्ती खाली बसला ससा धावत आला आणि हत्तीच्या अंगावरून स्पर्श न करता दुसऱ्या बाजूला गेला. आता हत्तीची पाळी आली. ससा खाली बसून होता. त्याला भीती वाटत होती की जर नंदूने  माझ्यावरून उडी मारली आणि तो पडला तर मी तर चिरडून जाईन. माझा तर जीव जाईल. तेवढ्यात नंदू हत्ती धावत आला. त्याच्या धावण्यामुळे जवळच्या नारळाच्या झाडावरील नारळ पडू लागले.
नंदू हत्तीला काहीच समजले नाही आणि तो तिथून आपले प्राण वाचविण्यासाठी दे धूम पळाला. ससा पळता पळता विचार करू लागला की त्या हत्ती पेक्षा हे नारळचं बरे आहे.माझा मित्र जर माझ्यावर पडला असता तर मला माझे प्राण गमवावे लागले असते. 
 
बोध- खरे मित्र बनवायचे असतात,पण असे खेळ कधीच खेळायचे नाही,ज्यामुळे  काही नुकसान होईल.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती