यावेळी कमी लोक हसले. काही वेळाने, जोकर तिसऱ्यांदा तोच विनोद सांगू लागला. पण तो त्याचे बोलणे पूर्ण करण्यापूर्वीच एका प्रेक्षकांनी त्याला अडवले, “अरे! किती वेळा तू तोच विनोद सांगशील. दुसरे काहीतरी सांगशील, आता ते मजेदार नाहीये.” जोकर थोडा गंभीर झाला आणि म्हणाला, “धन्यवाद भाऊ, मलाही हेच म्हणायचे आहे.जेव्हा तुम्ही लोक आनंदाच्या एका कारणामुळे वारंवार आनंदी राहू शकत नाही, तर मग दुःखाच्या एका कारणामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा दुःखी का होता, हेच आपल्या आयुष्यात अधिक दुःख आणि कमी आनंदाचे कारण आहे.आपण आनंद सहजपणे सोडून देतो पण दुःखाला धरून राहतो. “
तात्पर्य : जीवनात यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण दुःख विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो