हुशार बेडूक

मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (14:17 IST)
फार वर्षां पूर्वीची गोष्ट आहे. एकदा एक राजा आपल्या मुलासाठी आपल्या राजवाड्याजवळ एक मोठं तलाव बांधतो आणि त्या तलावात मासे खेळण्यासाठी सोडतो. तलाव तयार झाल्यावर राजाची सगळी मुलं त्या तलावातील मासे बघण्यासाठी जातात. त्या माश्यांसह एक बेडूक देखील असतो. या पूर्वी त्या मुलांनी कधी ही बेडूक बघितलेला नसतो. त्यांना त्या बेडूक ला बघून खूप आश्चर्य होतं. ते विचारात पडतात की या सुंदर मासांसह हा बेढब प्राणी कशाला? 
 
ते लगेचच त्याबद्दल जाऊन राजाला सांगतात. 
 
राजा लगेचच त्या आपल्या शिपायांना त्या प्राण्याला मारून टाकण्यास सांगतो.
 शिपाई तलावाकडे जाऊन बेडूक बघतात. ते आपसात विचार करू लागतात की याला कसे संपवायचे. कोणी म्हणे की ह्याला जाळून घ्या तर कोणी म्हणे की ह्याला उंचावरून फेकून द्यावे. तर कोणी म्हणे की चिरडून टाका. एक शिपाई म्हणे की आपण ह्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडलं म्हणजे त्याच्या प्रवाहात वाहून हा दूरवर जाऊन पडेल आणि एखाद्या खडकावर आदळून आपटून मरेल.

तो बेडूक फारच हुशार होता त्यांचे म्हणणे ऐकून ते बेडूक म्हणतो की मला आपण पाण्यात फेकू नका, नाही तर मी मरेन.
 
बेडकाचे बोलणे आणि विनवणी ऐकून शिपाई त्याला पाण्याच्या प्रवाहात सोडून देतात. बेडूक मनात विचार करतो की हे माणसे किती मूर्ख आहेत ह्यांना हेच माहित नाही की मी पाण्यातच सुरक्षित असतो. अश्या प्रकारे त्या बेडकाने आपल्या बुद्धीने आपले प्राण वाचविले. 
 
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती