मग संत म्हणाला, "आता जा आणि ते पिसे गोळा करून परत आण." शेतकरी परत गेला पण तोपर्यंत सर्व पिसे वाऱ्यात इकडे तिकडे उडून गेली होती. आणि शेतकरी रिकाम्या हाताने संताकडे पोहोचला. मग संताने त्याला सांगितले की तू बोललेल्या शब्दांसोबतही असेच घडते, तू ते सहजपणे तोंडातून काढू शकतोस पण तुला हवे असले तरी परत घेऊ शकत नाहीस. शेतकरी खाली मान घालून निघून गेला व परत कधी वाईट बोलला नाही.
तात्पर्य : वाईट बोलल्यानंतर शब्द परत घेता येत नाहीत. नेहमी चांगले बोलावे.