मुक्काम - पिझ्झा पोस्ट - ढोकळा तालुका - बर्गर जिल्हा - वेफर्स
प्रिय बर्फी ताईस
पेढे दादाचा सप्रेम नमस्कार
WD
समोसे दादाला 10 वीच्या परीक्षेत 70 टक्के गुण मिळाले. श्रीखंड मामा व बासुंदी मामींनी त्याचे अभिनंदन केले. कचोरी मावशी त्याला सायकल घेऊन देणार आहे. जिलेबी आजी व गुलाबजाम आजोबा तीर्थयात्रेला गेले आहेत. इडली आत्याचे लग्न डोसे काकांशी होणार आहे. कलाकंद काका व रबडी काकू आमच्याकडे 4 दिवस राहून गेले. छोटा म्हैसूरपाक आता दुसरीत गेला आहे. परवा आपल्या शेजारच्या मिरची वैनी व खोबरे काकांचे भांडण झाले. त्यांचे भांडण पाहून कांदेभाऊंचा डोळ्यात पाणी आले. कोथिंबीर दीदीने त्यांची भांडणे सोडवली.
बाकी सर्व ठीक आहे. कळावे लोभ असावा. पत्राचे उत्तर द्यावे.