कावळ्याने लावला नवा शोध

एक तहानलेला कावळा पाण्याच्या शोधार्थ इकडे तिकडे फिरत होता. अचानक त्याला एका घराच्या समोर एका चंबूत थोडेसे पाणी दिसले. त्याने ते मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्यापर्यंत त्याची चोच पोहोचत नव्हती. पाणी कसे मिळवावे याचा तो विचार करू लागला. काहीतरी प्रयत्न करून पहावा म्हणून त्याने बाजूला पडलेला एक दगड चोचीने उचलून पाण्यात टाकला. त्यानंतर आणखी काही दगड पाण्यात टाकून त्याने पाण्याचे निरीक्षण केले. 

ND ND  
पाणी पूर्वीपेक्षा वर आलेले पाहून त्याला खूप आनंद झाला. तो आणखी आणखी दगड गोळा करनू पाण्यात टाकू लागला. आता पाणी चंबूच्या काठापर्यंत आले होते. त्यात आपली चोच बुडवून तो भरपूर पाणी प्यायला. त्याची तहान भागली. कावळ्याला कुठले विज्ञान समजायला!
गरजेतूनच कल्पना सुचून नवे शोध लागतात हेच खरे!