एक होता अच्च्या अन् एक होता कच्च्या अच्च्या होता जाड्या तर कच्च्या होता रड्या अच्च्या खाई चॉकलेट तर कच्च्या खाई कटलेट अच्च्या म्हणजे भाजी वाढा तर कुच्च्या म्हणे भजी वाढा अच्च्या जेवे तुपाशी तर कच्च्या राही उपाशी पहाटे उठे अच्च्या तर घोरत पड कच्च्या अच्च्या करतो व्यायाम कच्च्यास नको काही काम अच्च्या बसे अभ्यासास कच्च्यास फक्त टि.व्हीत रस अच्च्या झाला पास पण कच्च्या मात्र नापास.