इंटरनॅशनल टायगर डे विशेष

गुरूवार, 29 जुलै 2021 (21:52 IST)
एक शानदार, उमदा जीव आहे तो,
जंगलाची सम्पूर्ण शान आहे तो,
देवीच्या वाहनाचा मान आहे त्यास खास,
लहान मुलांचा "दोस्त वाघोबा"म्हणतात त्यास,
संतुलन जीवन साखळी चे त्यामुळे राहते,
डरकाळी ने त्याच्या सारे जंगल दणाणते,
पर्यटन ही मोठ्या हौसेने "व्याघ्र"दर्शनास जातात,
जंगला च्या साऱ्या सफाऱ्या आधीच भरून जातात,
का म्हणून त्याची शिकार होते सतत,
दुष्ट मानव शिकार करण्यास वाघाची जरा नाही कचरत!
थांबायला हवंय हे दुष्टचक्र ताबडतोबच!
एकत्र ह्याकामी आपण यायला हवंच!
मग नांदेल "राजा जंगल "चा तिथं आनंदात,
कथा वाघाच्या मग आपण ही ऐकूयात!
.....अश्विनी थत्ते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती