हत्ती गेला शिंप्याकडे

NDND
हत्ती गेला शिंप्याकडे
देण्यासाठी माप
माप त्याचे घेता घेता
शिंप्यास लागली धाप

जिराफ गेला न्हाव्याकडे
करण्यासाठी दाढी
न्हावीदादा म्हणतो कसा
थांबा आणतो शिड

गाढव गेले गायनशाळेत
शिकण्यासाठी गाणी
मास्तरांना फीट आली
प्यावं लागलं पाणी.

र. गोविंद

वेबदुनिया वर वाचा