प्रथम वंदुनी श्री गणेशा आई सांगते काही तुजला तू वर्षाची झालीस माझ्या कोवळ्या फूला तुझे अभिनंदन करते आई या नवीन जगा तुला आयुष्य, यश, सुख कीर्ति लाभो हीच प्रभुला प्रार्थना आयुष्य हे ऊन सावली करी न याचा खेद जीवन हे परोपकारी ठेवी मनी हा भेद कपट ना कधी ही करी ना ठेवी दुर्भावना फुलच सुगंधित करते बाळा अवघ्या वातावरणा सहाय्य करावे अवघ्या जना न धरुनी काही भेद सहाय्यच ही कामास येते जेव्हा अडेल अपली वेळ तुला यश लाभो बाळा दैदिप्त सूर्या समान परि शीतलता ठेवी मनी या चंद्र किरणा समान तुला आयुष्य, यश, सुख, कीर्ति लाभो हीच शेवटी प्रार्थना गजानना.