लाडकी कोण?

एक होती सिंधू
तिला एक धाकटी बहीण होती
तिचे नाव इंदू

ND
एकदा सिंधूने आईला विचारले,
'आई, मी तुझी लाडकी ना?'
तोच इंदू म्हणाली,
'आई, मी तुझी लाडकी ना?'
आईने सांगितले,
'दुपारी सांगेन कोण लाडकी ते.'

ND
दुपार झाली
मुले अंगणात खेळत होती
खेळ खूप रंगात आला होता
तोच आईने हाक मारली
'सिंधू, जरा इकडे ये.'
सिंधूला खेळ सोडवेना
ती म्हणाली,

'मी नाही येत आता, मग येईन.'
मग आईने इंदूला हाक मारली
'इंदू, जरा इकडे ये.'
खेळ सोडून इंदू धावत गेली
आईने तिला चार पेढे दिले आणि म्हणाली,
'इंदू, तूच लाडकी बरे!'
हे सिंधूने एकले.
ती धावत आली,
पण तिला पेढा मिळाला नाही
तिला फार वाईट वाटले.

वेबदुनिया वर वाचा