प्राणी गेले गावाला

WDWD
एकदा एक गंमत घडली
सगळी प्राणी मंडळी गावाला गेली
कोल्हा गेला वेल्हायाला
गोड द्राक्षे खायला
ससा गेला दिल्लीला
राजकारण पहायला
वाघोबा गेले बॉम्बेला
त्यांचा घाम काढायला
मनी गेली जर्मनीला
शायनिंग खायला
उंट गेला जयपूरला
गुलाबी शहर पहायला
हत्ती गेला बारामतीला
गोड ऊस खायला
चार दिवसांनी सार्यांना आला कंटाळा
म्हणून सगळ्यांनी गाशा गुंडाळला
फिरून आले जंगलात
जायचं नाही कुठे निश्चय केला मनाता

- कु. आकांक्षा

वेबदुनिया वर वाचा