'मे' महिन्यातील मासिक राशीफल

शुक्रवार, 1 मे 2015 (10:36 IST)
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ) 
ज्याची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण तुमचा दरवाजा ठोठावणारच आहे. जुन्या कोर्ट-खटल्यांपासून सुटका मिळेल. वेळॆचा योग्य वापर करा. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. स्वाध्यायात आवड वाढेल, व्यापार चालेल. 

वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) 
या महिन्यात काहीतरी खास होणार आहे. राजकारणातली आवड उच्च स्थानावर पोहोचायला साहाय्यभूत ठरेल. स्पर्धेत यश मिळेल, साहित्य, संगीतातील आवडीचा फायदा होईल. तब्येतीची काळजी घ्या. महिन्याच्या पूर्वार्धात खर्च अधिक होईल, ज्यामुळे धन संचयात अडचण निर्माण होईल. चांदीच्या तांब्यात वाहत्या नदीचे पाणी भरून ठेवल्यास फायदा होईल.
 
मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा) 
ही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या दूरवरच्या प्रवासाला जाऊ शकता. जीवनात नवा आनंद प्राप्त होणारच आहे, खुल्या मनाने त्याचे स्वागत करा. एकाग्रचित्ताने काम करा, यश नक्की मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात नवा आनंद येणार आहे. एकुणच हा महिना चांगलेच फळ देईल.
 
कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो) 
महिन्याची सुरुवात कष्टप्रद होईल, पण १५ तारखेनंतर आर्थिक बाजूत सुधार होण्याची चिन्हे आहेत. पण शारीरिकदृष्ट्या उदर आणि गुडघ्याच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. आप्तजनांची साथ तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देत राहील. अपत्य-प्राप्तीचे सुख मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या मित्रांच्या भेटी तुम्हाला साहाय्यकारी ठरतील. शत्रू शांत असतील. सर्व काही सामान्य राहील. उगीचच इथे-तिथे भटकणे टाळा. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. चढ-उताराच्या दृष्टीने या महिन्याचा उत्तरार्ध ठीक असेल. अडलेली कामे पूर्ण होण्याची वेळ जवळ आली अहे.
 
सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)
मानसिक शांती लाभेल. तणाव पुरेशा प्रमाणात कमी होऊ शकेल. चित्त शांत राहील. अपत्याकडून शुभ बातमी कळेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. परिवारात आपला सम्मान वाढेल. तुमच्या बोलण्याला वजन येईल. आपल्या रचनात्मकतेचे कौतूक होईल. भौतिक साधनांवर पैसे खर्च होतील. मित्रांचे सहकार्य आपल्या जीवनाच्या गाडीला गतिमान करेल. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थी वर्गाला लाभ होईल. नोकरीत पुढे जाण्याची आशा आहे. आरोग्याप्रती सजग राहा. 
 
कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो) 
कोणीतरी जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतो. नोकरीत जागाबदल होण्याचे योग आहेत. वैवाहिक संबंधांमध्ये कटुता येऊ शकते. जोडीदाराच्या प्रती उदार धोरण ठेऊन वागा. तुमचा राग बनत्या गोष्टी बिघडवू शकतो. मद्यसेवनापासून दूर राहा, हे तुमच्यासाठी हितकारक आहे. अडकलेले धन परत मिळेल. कोर्ट-कचेरीची प्रकरणे सुरळीत होतील. आनंदात वाढ होईल. मुलांच्या बाजूने काही तरी त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची तब्येत चिंताजनक असेल. 
 
तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते) 
व्यापारी वर्गासाठी हा महिना फारच लाभदायक आहे. नशीब आपल्यासोबत आहे, पण बेपर्वाई आपल्याला फार मोठी हानी पोहोचवू शकते. खाजगी संबंधांच्या मदतीने मिळकतीचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील. महिला आणि वृद्धांना सांधेदुखीचा त्रास सोसावा लागू शकतो. लक्षात ठेवा क्रोध तुमचे नुकसानच करतो. तुमच्या वाणीला नियंत्रणात ठेवा. तुमच्या कुठल्यातरी गोष्टीवर तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो. कुठल्यातरी दुर्घटनेची शक्यता तयार होत आहे, यामुळे अतिरिक्त सावधानी बाळगा. 
 
वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू) 
अडलेली कामे होतील. खूप दिवसांपासून तुम्ही बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवत आहात, तो पूर्ण होईल. कोणीतरी तुमच्यावर खोटा आरोप लावण्याची संधी शोधत आहे., सावधान राहा. अधिकारी लोकांशी चांगले संबंध राहतील, जे तुम्हाला दीर्घकालीन लाभ देतील. मन अशांत राहील. विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल वेळ. मनासारखी स्थळं न मिळाल्याने निराशा राहील. वडील आणि भावाशी वाद होतील. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा.
 
धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे) 
शत्रू तुमचे अहित करण्याची संधी शोधत आहे, सावधान राहा. तुमच्या जुन्या अनुभवांपासून शिकून जीवनात मार्गक्रमण करा. स्वत:वर विश्वास ठेवा हीच यशाची शिडी आहे. घरात मांगलिक कार्ये होऊ शकतात. आई-वडील आणि वृद्धांचा आशीर्वाद घेऊन नवे काम सुरू करा. आळशीपणा दारिद्रयाचे दुसरे नाव आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. तुमचे चालढकलीचे वागणे तुमचे यश रोखू शकते. अधिकारीही तुमच्या या वागण्याने नाराज होऊ शकतात, वाहन वगैरे चालवताना सावधानी बाळगा. कोणा वृद्धाचा अपमान करु नका. 
 
मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी) 
तुम्ही जर तुमचा राग नियंत्रित करु शकलात, तर सर्व काही तुमच्या नियंत्रणात आहे. तुमचे शत्रू तुमच्या याच रागाचा फायदा घेऊ शकतील.लक्ष्य निर्धारीत करून मेहनतीने ते प्राप्त करण्यासाठी झटा, यश नक्की मिळेल. ही वेळ एखाद्या धडयासारखी आहे. कठीण वेळ आहे आणि याच वेळी तुम्हाला समजेल की कोण तुमचा किती मित्र आहे. मानसिक तणाव तर असेल, पण ईश्वर- नामस्मरणाने शांती मिळेल. महिनाअखेरच्या आठवडयात परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. धीर ठेवा तोच आपल्याला स्थिर ठेवेल. 
 
कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द) 
प्रवासाच्या नियमांचे पालन करा वेगाने वाहन चालवणे साहसाचे द्योतक नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ आहे. सोन्याच्या खरेदीने भविष्यात फायदा होईल. आपल्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मार्मिक वेळ आहे. उधार देऊ नका आणि घेऊही नका. मानसिकरीत्या सुदृढता जाणवेल. पैसे येण्याचे नवे मार्ग खुलतील. आरोग्याच्या भल्यासाठी बाहेर खाणे टाळा. सुर्योपासेनचा लाभ होईल. 
 
मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)
तुमच्या जीवनात अचानक बदल येतील. महिन्याच्या मध्यापर्यंत तुमचे नशीब पूर्णपणे तुमची साथ देईल. या दरम्यान भाग्य तुमचा दरवाजा ठोठावेल पण संधीचा फायदा घेणे तुमच्या हातात आहे. जोडीदाराचे वागणे तुमच्यासाठी सुखद असेल. कार्य प्रगतीवर राहतील. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात काही त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत तणाव होऊ शकतो. पण संयमाने वागल्यास तुम्ही प्रकरण सांभाळू शकता. मुलांच्या बाजूने काही समस्यांचा सामना करावा लागेल.

वेबदुनिया वर वाचा