साप्ताहिक भविष्यफल (7 ते 13 सप्टेंबर 2014)

शनिवार, 6 सप्टेंबर 2014 (17:50 IST)
मेष : यश देणारा कालखंड. सहकार्य मिळत राहिल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन वातावरण उत्साह निर्माण करेल. फायद्याच्या योजनांवर चर्चा होईल. शुभवार्ता समजतील. नोकरी बढती संभवते. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक योग अनुकूल. खरेदी कराल. कुटूंबातून चांगली बातमी कळेल. शुभ कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. 
 
वृषभ : चांगल्या योजनांवर चर्चा होईल. कोणावर एकदम विश्वास ठेवू नका. सयंम राखावा लागेल नाही तर अडचणी संभवतात. खरेदी-विक्रीचे व्यवहार सांभाळून करा. नोकरीत सहकार्‍याकडून नुकसान संभवते. मान-सम्मानास महत्त्व द्यावे लागेल.
 
मिथुन : विरोधक मागे लागतील. नोकरीत सावधगिरी बाळगा. कोणाची मध्यस्थी करू नका. व्यापारात जोखीम स्विकारावी लागेल. मानसिक थकवा जाणवेल. उत्साह कमी होईल.
 
कर्क : आवक चांगली होणार असल्याने खरेदी करू शकाल. मात्र व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे. 
 
सिंह : कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. अनुभवामुळे काम झटपट हातावेगळं कराल. व्यापार व व्यवसायासाठी अनुकुल काळ आहे. एखाद्या चांगल्या योजनावर चर्चा होईल. आपल्या कार्यातून प्रभाव पाडाल. अधिक प्रसन्न राहाल. कौटूंबिक कार्यात सहभाग घ्याल.
 
कन्या : कुटुंबातील वाद वेळीच मिटवणे योग्य ठरेल. कोणाच्या सांगली-वांगलीवर जाऊ नका. आवक साधारण राहिल. कर्जावाले तगादा लावतील. आरोग्यावर खर्च करावा लागेल. आळस झटका. 
 
तूळ : व्यापार-व्यवसाय मध्यम. कर्जावाले तगादा लावतील. कामकाजात मन लागणार नाही. आर्थिक चणचण भासेल. कुटुंबात वाद वाढल्याने उत्साह हळुहळु कमी होईल. नोकरीत अधिकारपदासाठी संघर्ष करावा लागेल.
 
वृश्चिक : नोकरीत अधिकारी वर्गाकडून शाबासकी मिळणार नाही. जुन्या अडचणी सतावतील. आर्थिक योग मध्यम राहतील. खर्च जास्त झाल्याने  देणी जड होतील. सौदे बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवास करताना दरम्यान काळजी घ्या.
 
धनू : कामाशी काम ठेवा. पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल. 
 
मकर : उत्साह देणारा काळ राहिल. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहिल. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी, विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा.
 
कुंभ : अनुभवाचा फायदा करून घ्यावा. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून उचित सहकार्य लाभेल. प्रवास योग संभवतो. 
 
मीन : विरोधक शांत बसतील. मानसिक थकवा जाणवणार नाही. अनुभवाचा चांगला वापर करता येईल. कुटूंबात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीच्या संधी येतील. प्रवास योग संभवतो.

वेबदुनिया वर वाचा