वृश्चिक राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

WD
गुरूचे अष्टमस्थानातील आणि भाग्यस्थानातील भ्रमण, मंगळाचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण तसेच शनीचे व्यवस्थानातील वास्तव्य या सर्वांमुळे नवीन वर्ष तुम्हाला संमिश्र फळ देणारे आहे. आपले ध्येय साध्य करण्याकरिता सतत प्रयत्न करीत असता. तसेच लोकांना, सहकार्‍यांना आपलेसे करून त्यांना बरोबर घेऊन जाण्यात मोठे सुख असते, हे विसरू नका.

पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी...


धंदा, व्यवसाय व नोकर

WD


फेब्रुवारी, मार्च महिन्यात कोणतही निर्णय अचानक घेऊ नका. जूनपर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न करून गंगाजळी साठविण्याचा प्रयत्न करा. जूनपर्यंत कमाई जरी समाधानकारक असली तरी वाढत्या खर्चामुळे पैसे हातात शिल्लक राहणार नाही. त्यानंतर पैसे मिळतील, पण ते नवीन गुंवणुकीकरिता वापरावे लागतील. नोकरीमध्ये जूनपर्यंतचा कालावधी कामाच्या दृष्टीने तणापवूर्ण वाटेल. जूननंतर परदेशी जाण्याची संधी निर्माण होईल. पण त्यामध्ये संदिग्धता असेल. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये बारकाईने अंदाज घेऊन पुढील वर्षाचे धोरण आखा. सामाजिक व शैक्षणिक क्षे‍त्रातील व्यक्तींना अधिक मान, प्रतिष्ठा प्राप्त होईल. महिला जबाबदारी समर्थपणे पार पाडतील.

पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान ....


गृहसौख्य व आरोग्यमा


WD

तरुणंनी जून ते सप्टेंबर या दरम्यान विवाहाच्या प्रश्नावर शिक्कामोर्तब करावे. यंदा नवीन वास्तूचा, स्थावरचा विचारही यशस्वी होईल. वरिष्ठ व घरातील अनुभवी व्यक्तींशी संघर्ष करू नये. मे व सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये प्रकृतीची हेळसांड न करता उपाययोजना कराव्यात. वृश्चिक रास ही स्थिर गुणधर्माची, जल तत्त्वाची आहे. तिचा अधिपती मंगळ आहे ‍व चिन्ह विंचू आहे. शुभरंग भडक तांबडा, शुभरत्न टोपाझ व आराध्य दैवत देवी-गणपती आहे.

वेबदुनिया वर वाचा