नवीन वर्ष आणि तुमचे ग्रह!

WD
मेष
शनी 15 नोव्हेंबर 2011ला तूळ राशीत जात आहे व कन्या राशीत पुन्हा वक्री होऊन मे 2012मध्ये जात आहे. मंगळ जुलै 2012 पर्यंत म्हणजेच जवळ जवळ 8 महिने सिंहेत आहे व वैशिष्य शुक्राचे भ्रमण मार्चअखेर ते जुलै अखेरपर्यंत म्हणजेच 4 महिने वृषभ राशीत आहे. हे सर्व ग्रहमान तुमच्या दृष्टीने चांगले आहे. तेव्हा चांगला ग्रहमानाचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही घेऊ शकाल.

नोकरीमध्ये गुणांना वाव मिळेल. वरिष्ठ कामाची दखल घेतील. त्याचे फायदे मे नंतर मिळायला सुरुवात होईल. बढती मिळाण्याच योग येतील. देशात ‍‍किंवा परदेशात प्रवासाची संधी मिळेल. बदली किंवा नवीन नोकरीहवी असल्यास जुलै ते सप्टेंबर या कालावधीत प्रयत्न करा. कौटुंबिक सौख्य वाढवणारे वर्ष आहे. लांबलेले मंगलकार्य तडीस जाईल. तरुणांना व्यावसायिक स्थिरता लाभेल. विवाहाचे योग मार्च ते ऑगस्ट या कलावधीत प्रबळ. विद्यार्थ्यांना भरघोस यश देणारे वर्ष आहे. शिक्षणाकरता परदेशात जाऊ इच्छिणार्‍यांना एप्रिल ते जुलै हा कालावधी विशेष चांगला. राजकारणी व्यक्तींना मानाचे स्थान भूषविता येईल, पण त्यांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे लक्षात ठेवावे.

WD
वृष
गुरुचे भ्रमण मे 2012 पर्यंत व्ययात आहे. शनीही षष्ठात जात आहे. मंगळही चतुर्थात बराच काळ राहत आहे. मात्र नंतर शुक्र मार्चअखेर वृषभेत जात आहे व चार महिने तेथेच वास्तव्य आहे. तेव्हा खर्‍या अर्थाने तुमच्या अनेक गोष्टी मार्गी लागतील. वेगवेगळ्या समस्यांवर तोडगे निघतील.

व्यापारधंद्यात काही बेत रद्द झाल्यामुळे किंवा लांबल्यामुळे गैरसोय. खर्चात वाढ. मार्चनंतर नवीन कामे मिळण्याची शक्यता. मे नंतर प्रगतीचा वेग वाढेल. जुलैपर्यंत येणी वसूल होतील. काही कर्ज फेडू शकाला. ज्यादा भांडवल उपलब्ध होईल. यश मिळवण्यासाठी संघर्ष आवश्यक.

नोकरीत गैरसोय करणारी परिस्थिती दिवाळीच्या सुमारास पण नंतर तणाव कमी. परदेशातून किंवा बदलीच्या गावहून मेच्या सुरुवातीला परत येता येईल.

कौटुंबिक जीवनात एप्रिलपर्यंतचा कालावधी खर्चिक. शुभसमारंभ एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत. देशात-परदेशात स्थलांतर होण्याची शक्यता. वडिलोपार्जित प्रॉपर्टीसंबंधीचे महत्त्वाचे निर्णय होतील. तरुणांना गृहस्थाश्रमात प्रवेक करता येईल. वृद्धांना वर्षभर पथ्य सांभाळावे लागेल.

विद्यार्थ्यांसाठी मे पूर्वीचा काळ खडतर. त्यानंतर बसलेल्या परीक्षेत जास्त यश. स्पर्धा परीक्षेकरता वर्ष चांगले. कलाकार- खेळाडू यांना एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत पूर्वी न मिळालेले यश किंवा संधी चालून येईल.

WD
मिथु
नवीन वर्षात नशिबाचे चढउतार पाहायला मिळतील. एप्रिलपर्यंत चिंता दूर होऊन इच्छा पूर्ण, पण नंतर थोडीशी खडतर वाटचाल. सावध पवित्रा आवश्यक. हौशी स्वभावाला मुरड आवश्यक.

व्यवसायात द गदग धावपळ वाढेल. ज्या प्रमाणात गुंतवणूक केलीअसेल त्या प्रमाणात लाभ मिळेल. नोकरदार व्यक्तींना जानेवारीपर्यंत आपल्यावर अन्याय झाल्याची भावना अस्वस्थ करेल.

नोकरदार व्यक्तींना अपुर्‍या आकांक्षा मार्चपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर जबाबदारीचे ओझे. वरिष्ठ कौतुक करतील पण न पेलवणार्‍या जबाबदार्‍याही देतील. नोकरीतील बदल, परदेशगमन जुलैपूर्वी शक्य.

वर्षाची सुरुवात कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने समाधानकारक. नवीन जागा, वाहन खरेदी मार्चपर्यंत शक्य. पण नाकापेक्षा मोती जड होऊ देऊ नका. जून-जुलैनंतर मुलांचे उपद्‍व्यापल शिक्षणामुळे होणारे खर्च आणि वृद्ध व्यक्ती यासाठी खर्च.

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावेत. शॉर्टकट नको. परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणार्‍यांनी मार्च-एप्रिलपर्यंतच आवश्यक ती पूर्तता करावी. कलाकार-खेळाडू जनूपर्यंत चांगली कामगिरी करून नाव कमावतील. नंतरचा कालावधी साधारण.

WD
कर्क
नवीन वर्षात भाग्यवर्धक गुरू आणि मंगळ व शुक्राची साथ मिळेल. वर्षाचे दोन भाग. जून-जुलैपर्यंत अनेक मनोकामना साकार. कठीण कामात यश. त्यामुळे आनंद होईल. घरगुती जबाबदार्‍यांमुळे गालबोट.

व्यवसायात प्रगतीचा वेग समाधानकारक राहील. जानेवारीपासून नवीन उपक्रमांची सरुवात करायला काळ चांगला आहे. जून-जुलैमध्ये काही तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. ऑगस्टपासून नवीन संक्रमणाची तयारी करा.

कौटुंबिक सुख आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने वर्ष फारचे चांगले नाही. चतुर्थस्थानातील शनीमुळे खूप जबाबदार्‍या येऊन पडतील. त्याचा परिणाम करिअरवरही होण्याची शक्यता.

विद्यार्ध्यांना उत्तम ग्रहमान लाभत आहे. त्यांना चांगले यश मिळेल. कलाकार, खेळाडू आणि राजकारणी व्यक्ती अद्वितीय कामगिरी करून एखाद्या पारितोषिकाचे मानकरी ठरतील. आर्थिकदृष्टाही त्यांना वर्ष फलदायी जाईल.

WD
सिंह
नवीव वर्षात साडेसाती संपणार हेच सगळ्यात मौल्यवान आणि दिलासा देणारे. दबलेल्या इच्छा आकांक्षांना वाव मिळेल. गुरुसारखा शुभग्रह वर्षभर पाठीशी. शुक्र आणि मंगळ हे सुद्धा अनेक स्वप्ने साकार करायला सिद्ध. थोडक्यात महत्वाच्या ग्रहांची कृपादृष्टी.

शत्रुंची नजर तुमच्या सफलतेवर आहे आणि तुमच्या क्रोधामुळे त्यांचे काम सोपे होऊ शकेल. गुप्त गोष्टी कोणालाही सांगणे टाळा. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल.

मानसिक शांती लाभेल. तणाव पुरेशा प्रमाणात कमी होऊ शकेल. चित्त शांत राहील. अपत्याकडून शुभ बातमी कळेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. परिवारात आपला सम्मान वाढेल. तुमच्या बोलण्याला वजन येईल.

वातावरणाचा आनंद लुटा. शैक्षणिक कार्यात खर्च होईल. जोडीदाराचे वागणे तुमच्यासाठी साहाय्यकारी सिद्ध होईल. व्यवसायात जे आपल्याजवळ आहे ते कसे टिकवायेच याचा विकार करा. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका.

WD
कन्य
संमिश्र ग्रहमान नवीन वर्षात लाभत असल्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक गेऊन वाटचाल करावी. पुढचे पाऊल जोवर भक्कमपणे रोवले जात नाही तोवर मागले पाऊल उचलायचे नाही. राशीतील शनी जुलैपर्यंत तुम्हाला नवनवीन प्रश्नात गुंतवून ठेवेल.

तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. नशीबाची गाडी थांबून थांबून पुढे सरकत आहे. कुठेतरी काहीतरी अडथळा आहे जो तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतो आहे. मित्र तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तत्पर राहतील. जोडीदाराचे हेकेखोर वागणे मानसिक तणाव वाढवेल. नोकरदार लोकांचे बॉसशी पटणार नाही. आरोग्यही साथ देणार नाही. एकुणातच हा महिना आपल्याला शुभ फ़ळ देणार नाही.

नशीबाचे ग्रह पालटत आहेत, पण दृढ इच्छाशक्तीशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. तुमच्या मेहनतीचे कौतुक तर होईल पण यासह शत्रूंचे तुमच्याप्रती वैमनस्य वाढेल. वेळॆचे नीट नियोजन केल्यास अडलेली अनेक कामे होऊ शकतील. यावर ध्यान देण्याची गरज आहे. विदेश प्रवासाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुलतील. तुमचे शांत चित्त तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल.

जोडीदाराची साथ मिळेल. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल. मुलांसोबत काही खास क्षण घालवण्याची संधी मिळेल. भाऊ किंवा बहिणीकडून एखादी शूभ बातमी समजणार आहे. कोणीतरी जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतो. नोकरीत जागाबदल होण्याचे योग आहेत. वैवाहिक संबंधांमध्ये कटुता येऊ शकते.

कौटुंबिक खर्च वाढवणारे वर्ष. याची नांदी ऑगस्यपासून झालेलीच असेल. जुलैपर्यंत विविध कारणांनी पैसे खर्च होत राहीतल. त्यात स्वत:ची किंवा घरातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती, चुकीचे झालेले निर्णय निस्तरणे आणि अनपेक्षित समस्या यांचा समावेश. म्हणून सतत पैशाची तजवीज आवश्यक.

कलाकार खेळाडू आणि राजकारणी व्यक्तींच्या स्वाभाविक वृत्तीला झळाळी आणणारे ग्रहमान आहे. विरळाच लाभणारा गौरव त्यांना मिळेल. अफवा, असूया वगैरे गोष्टींनाही त्यांना तोंड द्यावे लागेल.

कन्या

वेबदुनिया वर वाचा