कदाचित काही वर्षांनी या संवादात आपलाही सहभाग असू शकेल.
७५ वर्षाची आजी आणि ८० वर्षाचे आजोबा यांच्यातला सुखद संवाद...
आजोबा : मी किचनमधे जातोय. तुला काही आणू का?
आजी : आईस्क्रीम आणा एका कपमध्ये. लिहून घ्या, नाही तर विसराल..
आजोबा : अगं, तेवढं आठवणीत राहते बरं, तू पण ना... ...
आजी : अहो, आईस्क्रीमवर स्ट्रॉबेरी तेवढी ठेवा.
आजोबा : अगं, एवढ्यात काय विसरेन ?
आजी : आणि एक सांगू? आइस्क्रीमवर क्रीम पण टाकून आणा. आता तर लिहूनच घ्या. नक्कीच विसराल.
आजोबा : अगं, आणतो सगळं तू सांगितलं तसच, बस्...!
अर्ध्या तासांनी आजोबा डोकं खाजवत एका प्लेटमध्ये शेव नी कुरमुरे घेऊन परत आले..
आजी : बघा आता, म्हणूनच मी सांगत होते... विसरलात ना ? मी शेव कुरमुरेमध्ये बुंदी टाकून आणा असं सांगितलं होतं, नाही ना राहीलं लक्षात ?