हात

शनिवार, 18 मे 2019 (14:01 IST)
हातात हात घेतला 
तर मैत्री होते
दोन्ही हात जोडले
तर भक्ती होते.
हातावर हात आपटला
तर टाळी होते
कुणाला हात दिला
तर मदत होते.
कुणाला हात दाखवला
तर धमकी होते
हात वर केले
तर असहाय्यता दिसते
हातावर हात ठेवले
तर निष्क्रियता दिसते
हात पुढे केला
तर मदत दिसते
हात पसरले
तर मागणी होते
हातांचं महत्व इतकं
अनेक हात पुढे आले
तर अशक्य ते शक्य होते.
 
अनिल जोशी.॥.
 
स्रोत: मुद्रा ग्रंथ

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती