'पप्पा मी तुम्हाला कधी रडवलंय का?'

गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (18:10 IST)
माझी मुलगी मोठी झाली.
एके दिवशी सहज म्हणाली,
 
'पप्पा मी तुम्हाला कधी रडवलंय का?'
 
मी म्हटलं, 
'का रे पिल्लू असं का विचारतेस?'
 
ती : 'काही नाही असंच.'
 
मी : 'नीट आठवत नाही. पण एकदा '
 
ती : 'कधी?' 
तिनं अधिरतेनं विचारलं.
 
मी म्हणालो, 'तू एक वर्षाची असताना मी तुझ्यासमोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं. 
कारण मला बघायचं होतं की, 
तू काय उचलतेस?
 
तुझी निवड ठरविणार होती की, 
मोठेपणी तू कशाला जास्त महत्व देतेस.
 
जसे 
पैसे म्हणजे संपत्ती, 
पेन म्हणजे बुद्धी 
आणि 
खेळणं म्हणजे आनंद.
 
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो.
 
मला बघायची होती तुझी निवड.
 
तू एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस 
आणि 
मी तुझ्या पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.
 
तू रांगत-रांगत पुढे आलीस.
मी श्वास रोखून पहात होतो 
आणि 
क्षणार्धात तू त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.
 
माझ्या लक्षातच नाही आलं की,
'या सगळ्यांबरोबर मीसुद्धा एक निवड असू शकतो.'
 
ती पहिली वेळ होती जेव्हा तू मला रडवलंस.
 
खास मुलींच्या पप्पांसाठी.
खरंच मुलगी पाहिजेच. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती