आठवा बरं कोण-कोण बसतं तुमच्या बॅकसीटवर...
ताई, दादा, आई, बाबा, मित्र-मैत्रिणी, इ.
तुम्ही एक स्टेटस वाचलं असेल...
अन् एकटे असल्यावर तर वार्यावर स्वार...
बघा ड्राईव्हर तुम्हीच पण तुमची बॅकसीट ठरवते तुम्ही गाडी कशी चालवणार ते....
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव टाकणारी व तुमच्यावर अवलंबून असणारी माणसं हीच तुमची बॅकसीट...यामध्ये तुमचे आई-बाबा, ताई-दादा, नवरा/बायको-मुलं असे सर्व...