आई वडील

सोमवार, 8 जानेवारी 2018 (11:45 IST)
आम्ही काय तुम्हांला 
जन्मभर पुरणार आहोत का?
 
अस आई सहज म्हणून गेली
ऐकून हे माझ्या काळजात आरपार एक कळ निघून गेली...
 
त्रिवार सत्य होत पण
पटतच नव्हते मनाला 
कधीच विसरणार नाहीत आपण
त्यांच्या सोबतच्या क्षणांला
 
आई बोलुन गेली पण
वडील पाहून हसत होते 
खर सांगु का तेव्हा ते दोघेही मला
विठ्ठल रुक्मिणीच वाटत होते...
 
लेकरांच्या सुखातच त्यांच
सुख असत दडलेल.....
आपण सुंदर शिल्प असतोत
त्यांच्याच हातुन घडलेल...
 
मी म्हणाले आईला तु कीती 
सहज बोलून गेलीस
तुमच्या शिवाय जगण्याची 
तु कल्पनाच कशी केलीस 
 
जग दाखवले तुम्ही आम्हांला 
कीती छान बनवलंत
अनेकदा ठेच लागण्यापासुन
तुम्हीच तर सावरलत...
 
तुमच्या चेहर्यावर हसु पाहण्या साठी आम्ही काहीही करू 
तुमच्या स्वप्नातील चित्रात आम्ही 
यशाचेच रंग भरु....
 
आई वडील म्हणजेच घरातील 
चालता बोलते देव आहेत
हे देव नैवेद्या पेक्षा फक्त प्रेम व
आधाराचेच भुकेले आहेत...
 
कल्पवृक्षाखाली बसले होते 
फळेफुले माझ्यावरच पडत होती 
आई वडिल अनमोल आहेत असे
प्रत्येक पाकळी सांगत होती 
 
थकलीय आज आई प्रत्येकाची
वडीलही थकले आहेत....
घरट्यातल्या पिल्लाने उडु नयेत
फक्त एवढ्याच त्यांच्या अपेक्षा आहेत. ....
 
माझ्या या विचाराने आई
खुप खुप सुखावली होती 
वडिलांची नजर न बोलताही 
सारे काही सांगुन जात होती.......

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती