उगाच प्रत्येक ठिकाणी शहाणपणा करू नये

बुधवार, 20 जानेवारी 2021 (12:20 IST)
एका कारखान्यात काही काम नसल्याने एकजण जमिनीवर उभ्याउभ्या उगीच इकडे तिकडे बघत होता...
त्या कारखान्याचा मुख्याधिकारी तिथे आला आणि त्या माणसाला म्हणाला, "तुझा पगार किती ?"
माणूस म्हणाला, "साहेब, ५००० रुपये"
मुख्याधिकाऱ्याने खिशातून पाकिट काढून त्या माणसाच्या हातावर १५००० रुपये ठेवले आणि म्हणाला, "मी इथे काम करणाऱ्या लोकांना पगार देतो. उगीच टिवल्याबावल्या करणाऱ्याला नाही. हा घे तुझा तीन महिन्याचा पगार. चल निघ इथून आणि परत फिरकू नकोस इकडं"
तो माणूस निघून गेला बिचारा....
मुख्याधिकाऱ्याने मग इतर कर्मचाऱ्यांना विचारले, "कोण होता तो ?"
कर्मचारी म्हणाले, " साहेब, तो पिझ्झा घेऊन येणारा मुलगा होता."

तात्पर्य: उगाच प्रत्येक ठिकाणी शहाणपणा करू नये

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती