"कप - बशी" मजेशीर कविता

शुक्रवार, 10 जुलै 2020 (10:37 IST)
बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला 
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर...!
 
कप म्हणाला बशीला 
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन् लावतात तुला ओठाला...!!!
 
कप - बशी 
स्त्री आणि पुरुष यांचे प्रतीक असलेली कप बशी. स्त्री आणि पुरुष कप-बशीप्रमाणे एकरूप, परस्पर पूरक आहेत. त्यांना एकटे अस्तित्व नाही. दोघे जोडीनेच वावरतात. बशी ही स्त्रीचे तर कप हे पुरूषाचे प्रतीक आहे. कप भर चहाने घटकाभर उत्साह वाटला तरी बशीभर चहाने अंतरात्मा शांत राहतो. कपाप्रमाणे पूरूष ताठ तर स्त्री बशीप्रमाणे विनम्र असते. कप पोरकट असतो, म्हणून त्याचा कान धरावा लागतो. पण कपातून सांडले तर बशी सांभाळून घेते. एकमेकांना सांभाळण्यास पूरक जन्मभर टिकणारी अन्यथा फुटण्याला निमित्त शोधणारी अशी ही जोडी
 "कप - बशी".

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती