तुम्ही सफरचंद इथेच खाणार की पाठवू घरी..

मंगळवार, 31 मे 2022 (15:32 IST)
एका राजाने आपल्या राज्यात सर्वे करायचा ठरवला..आपल्या राज्यात वैवाहिक जीवनात घरात पतीचा हुकूम चालतो की पत्नीचा..? यासाठी त्याने पारितोषिक जाहीर केले की घरात पतीचा हुकूम चालत असेल त्या व्यक्तीने मनपसंत घोडा घेऊन जावा..आणि पत्नीचा हुकूम चालत असेल तर एक सफरचंद..
 
दरबार भरला एक एक नगरवासी येऊ लागला आणि सफरचंद घेऊन जाऊ लागला..
राजाला चिंता वाटू लागली, एवढ्यात एक उंचपुरा तलवार कट मिश्या, लाल डोळे असलेला तगडा तरूण राजा समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला..महाराज आणा घोडा मला देऊन टाका, कारण माझ्या घरात माझाच हुकूम चालतो..
 
राजा अत्यानंदाने त्या तरूणाला म्हणाला जा आपला मनपसंत घोडा घेऊन जा, तरूण काळा घोडा घेऊन निघून गेला..चला एक तरी निघाला ज्याचा हुकूम घरात चालतो, राजा स्वतःशीच बोलला..
 
काही वेळाने तो तरुण दरबारात परत आला, त्याला पाहून राजा म्हणाला, काय झाले तु परत का आलास?
त्यावर तरुण म्हणाला, महाराज पत्नी म्हणतेय काळा रंग अशुभ असतो, पांढरा रंग प्रगतीचा प्रतीक असतो..म्हणून तुम्ही पांढरा घोडा घेऊन या, तर तुम्ही मला पांढरा घोडा देऊन टाका.. 
हे ऐकून राजा डोक्याला हात लावत तरूणाला म्हणाले, बाबा ते सफरचंद घे आणि निघ घरी...
 
रात्रीपर्यंत पुर्ण दरबार खाली झाला, सगळे नगरवासी सफरचंद घेऊन निघून गेले..मध्यरात्री महामंत्री राजाच्या खोलीत आले, राजाने कारण विचारले त्यावर ते म्हणाले..महाराज तुम्ही पारितोषिक म्हणून घोडा आणि सफरचंद ऐवजी धान्य आणि सोने ठेवले असते तर बरे झाले असते..
 
राजा: मी देखील पारितोषिक म्हणून धान्य आणि सोनेच ठेवणार होतो..परंतु महाराणी म्हणाल्या घोडा आणि सफरचंद योग्य राहील, म्हणून नाईलाजा झाला..
महामंत्री: महाराज तुमच्या साठी सफरचंद कापू की.. 
महामंत्रीच्या या मिश्किल वाक्याने राजाने खळखळून हसत महामंत्रीला विचारले.. तुम्ही हा प्रश्न मला उद्या सकाळी विचारू शकले असते, एवढ्या रात्री येण्याची काय गरज होती..
महामंत्री: होय महाराज पण धर्मपत्नी म्हणाल्या आताच्या आता जा आणि विचारून या, काय कारण आहे कळेल तरी..
मध्येच थांबवत राजा: महामंत्रीजी सफरचंद तुम्ही स्वतः घेऊन जाणार की मी घरी पाठवून देऊ...
 
समाज कितीही पुरूष प्रधान असला तरी संसार हा स्त्री प्रधानच आहे..मी देखील ही पोस्ट उद्या टाकणार होतो पण..सौ. म्हणाल्या आताच्या आता, नाही तर मग काय उचलला एक तुकडा सफरचंदाचा टाकला तोंडात आणि लागलो लिहायला.. आता तुम्ही सफरचंद इथेच खाणार की पाठवू घरी..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती