जॉन बुकॅनन: 'नाईट रायडर्स' कोलकाता संघाचे प्रशिक्षक

पूर्ण नाव: जॉन मार्शल बुकन
जन्म: 5 एप्रिल 1953, ला इप्सविच, क्विंन्सलंडमध्ये झाला.

सलग तिसर्‍यांदा विश्वविजेता राहिलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे ते प्रशिक्षक होते. 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक बनले होते. त्यांच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियाने सलग 15 सामने जिंकण्याचे विश्वविक्रम केला होता. कर्णधार रिकी पॉटींगच्या काळात बुकॅननने ऑस्ट्रेलियाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला. त्यामध्ये 16 कसोटी व विश्वकरंडक स्पर्धेत 23 एकदिवसीय सामन्यात विजय मिळविण्याचा विश्वविक्रमही आहे. ते प्रशिक्षक असताना ऑस्ट्रेलियाने सलग तीन वेळा विश्वकरंडक जिंकला.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी त्यांचा विचार केला होता. पण त्यांनी कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाला प्रशिक्षक म्हणून काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. नंतर ऑक्टोबर 2007 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या एम्बेसिडर फॉर क्रिकेट कोच या पदाचा स्वीकार केला होता.

वेबदुनिया वर वाचा