पूर्ण नाव: रविंद्र रामनारायणसिंग जन्म: 14 सप्टेंबर, 1963 ला त्रिनिनाद आणि टोबॅगोच्या प्रिन्स शहरात झाला होता.
रॉबिनसिंग भारतीय क्रिकेटमधील एकदिवसीय संघाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यांनी आपल्या करीअरची सुरवात भारताकडून 11 मार्च 1989 मध्ये वेस्ट इंडीजविरूद्ध केली होती. त्यानंतर सात वर्षे त्यांना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती.
रॉबिनसिंग अष्टपैलू खेळाडू होता. मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यम-जलदगती गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी चांगली होती. उत्तम क्षेत्ररक्षणासाठीही त्याची आठवण काढली जाते. काही दिवस त्यांनी भारतीय संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कामही केले. रॉबिनसिंगने आपल्या घरच्या संघाकडून (तामिळनाडू) खेळ केला. आता ते चेन्नईच्या अड्यारमध्ये राहत आहेत.