कान स्वच्छ करण्यासाठी उपाय, याने ऐकण्याची क्षमताही वाढेल

मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (09:09 IST)
अनेकांना ऐकण्याच्या वेगवेगळ्या समस्या असतात, पण तुम्हाला माहीत आहे का की अनेक केसेसमध्ये कान स्वच्छ करून ही समस्या दूर होऊ शकते. 
 
काहीवेळा कान स्वच्छ करुनही ऐकण्याची क्षमता खूप सुधारली जाऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला या घरगुती उपाय अमलात आणावा लागेल. 
 
या उपायासाठी लसूण आणि ऑलिव्ह ऑइल आवश्यक आहे. पण हा उपाय करण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कानाला अंतर्गत दुखापत झाली असेल, इन्फेक्शन असेल किंवा कानाची इतर कोणतीही समस्या असेल तर हा उपाय मुळीच करु नका.
 
सामुग्री - 
लसणाचे 4 तुकडे, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल आणि इअर ड्रॉपर.
 
कृती - 
लसूण धुवून सोलून घ्या. एका भांड्यात ठेवा आणि त्यात ऑलिव्ह तेल घाला.
बरणी बंद करा आणि उघड्यावर ठेवा. सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. 
दोन दिवसांनी जार उघडा. 
तेल गाळून घ्या.
याचे 2 थेंब कानात टाका आणि कानात कापूस टाका. काही मिनिटे असेच राहू द्या. 
 
काळजी घ्या-
असे पाच दिवस करा. यानंतरही बरे होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कानात खाज सुटणे, वेदना किंवा इतर कोणतीही प्रतिक्रिया असल्यास हा उपाय ताबडतोब बंद करा.
 
सावधगिरी- 
कान स्वच्छ करण्यासाठी कढी, पेन्सिल, काठी किंवा इतर काहीही वापरू नका. यामुळे तुमच्या कानाला इजा होऊ शकते. टॉवेल किंवा कापडाने मेण पुसून टाका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती