हिवाळ्याची काळजी घ्या : Liquid Diet ने आपले वाढते वजन नियंत्रित करा

मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (15:37 IST)
हिवाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते. थोडा देखील निष्काळजीपणा आपल्या आरोग्यास हानिकारक होऊ शकतो. हिवाळ्यात आपली प्रतिकारक शक्ती कमी असल्याने आपण सहजपणे आजाराला बळी पडता. त्याचबरोबर, या हंगामात वाढणारे वजन देखील खूप त्रास देतात. या सर्व त्रासांपासून सुटका मिळविण्यासाठी आम्ही आपल्याला या लेखात अशा 6 लिक्विड बद्दल सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण या सर्व त्रासापासून मुक्त होऊ शकता. चला जाणून घेऊ या.
 
1 गरम पाणी-  सर्वात सोपं आणि सुलभ मार्ग आहे गरम पाणी पिणं, जे गरम असल्यामुळे निर्जंतुक असत. हे पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीला सुधारतं, ज्यामुळे आपण आजारांपासून वाचता.
 
2 चहा - चहा ग्रीन असो किंवा ब्लॅक किंवा आलं घातलेला असो किंवा दालचिनीचा. गरम चहा आपल्याला थंड हवामानात आजारी पडण्यापासून वाचवू शकता, म्हणून त्यांचे सेवन करणे टाळू नये.
 
3 सूप - आरोग्यासाठी सूप हे नेहमीच चांगले पर्याय म्हणून आहे. म्हणून आपण आपल्या आवडीच्या सुपाचे गरम गरम सेवन करावे, आणि हिवाळ्यात निरोगी राहा. 
 
4 दालचिनीचे पाणी - दालचिनीला पाण्यात उकळवून तयार केलेल्या पाण्याचा वापर हंगामाच्या आजारापासून आपल्याला वाचवतो, हा तर एका चांगला पर्याय आहे.
 
5 तुळशीचा काढा -  तुळशीचा काढा या हंगामात आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवतो. आपली इच्छा असल्यास या मध्ये गूळ, आलं किंवा लवंगा देखील घालू शकता पण कमी प्रमाणात.
 
6 जिऱ्याचे पाणी - वाढत्या वजनाने त्रस्त आहात, तर आपण आपल्या आहारात जिऱ्याचे पाणी समाविष्ट करावे. हे आपल्या वाढत्या वजनाला नियंत्रित करण्यास मदत करेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती