Home Remedies :पोटातील जंत घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा

मंगळवार, 17 मे 2022 (15:33 IST)
पोटात जंत असणे ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या लहान मुलांमध्ये जास्त दिसून येते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि स्वच्छतेकडे योग्य लक्ष न देणे हे याचे प्रमुख कारण आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलाच्या किंवा घरातील कोणत्याही सदस्याच्या पोटात जंत झाले आहेत, तर या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. 
 
1 मुळा-
50 मिली मुळ्याच्या रसात सेंधव मीठ आणि काळी मिरी मिसळून रोज सकाळ संध्याकाळ प्यायल्याने आतड्यांतील जंत नष्ट होतात.
 
2 गाजर-
दर रोज सकाळी रिकाम्या पोटी गाजराचा रस प्यायल्याने पोटातील जंत दूर होतात. गाजर किंवा इतर कोणत्याही गोष्टीची कांजी बनवून ती सतत 5 आठवडे प्या, पोटातील जंत नाहीशे होतील.
 
3 काळी मिरी- रात्री झोपताना4-6 काळी मिरीपूड एक कप मठ्ठ्यासोबत घेतल्याने पोटातील जंत दूर होतात.
 
4 मध-
चिमूटभर ओवापूड एक चमचा मधासोबत घ्याव्यात. हे चूर्ण दिवसातून तीन वेळा घेतल्याने पोटातील जंत मरतात.
 
5 कलोंजी-
10 ग्रॅम कलोंजी बारीक करून 3 चमचे मधासोबत रात्री झोपताना नियमितपणे सेवन केल्याने पोटातील जंत नाहीशे होतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती