घरचा वैद्य, जाणून घ्या 5 उपाय

तसे तर शारीरिक वेदना सामान्य समस्या आहे, लहान-सहान वेदनांसाठी अनेक लोकं डॉक्टरकडे जायला टाळतात. पण वेदनांमुळे परेशानही असतात. अश्याच काही वेदनांसाठी किचनमध्ये आपल्या वैद्य सापडू शकतो. वाचा किचनमध्ये आढळणारे 5 औषध...

कांदा- कानाच्या वेदनेमुळे त्रस्त आहात, तर घाबरण्यासारखे काही नाही. कांद्याच्या रस काढून कापसाच्या मदतीने कानात दोन ते तीन थेंब टाका. काही वेळेतच आराम मिळेल.

हळद- शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गरमागरम दुधात हळद मिसळून सेवन करा. याव्यतिरिक्त तेल आणि हळद गरम करून शरीरावर लावल्यानेही लाभ मिळेल.
लसूण- हे अॅटी बॅक्टीरिअल आणि अँटी इंफ्लेमेटरी तत्त्वाने भरपूर औषध आहे, ज्याने उष्णताही प्राप्त होते. शारीरिक वेदनेत लसूण सर्वोत्तम विकल्प आहे. याव्य‍तिरिक्त कानात वेदना होत असल्यास लसणाच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने आराम मिळतो.

लवंग- दात दुखीवर लवंग सर्वोत्तम उपाय आहे. भाजलेल्या लवंगीची पेस्ट किंवा लवंगीचे तेल कापसाने दाताला लावल्याने वेदनांपासून मुक्ती मिळेल.
दालचिनी- याने विशेषतः महिलांना मासिक पाळीदरम्यान होणार्‍या त्रासापासून मुक्ती मिळते. अधिक रक्तस्त्राव होत असल्यास दालचिनी लाभकारी ठरेल. केवळ दालचिनी टाकून चहा बनवा किंवा तयार चहामध्ये दालचिनी पावडर टाकून सेवन करा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती