सध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत एका जागेवर उभे राहिल्याने पायाला थकवा जाणवू लागतो. या परिस्थितीत घरगुती उपायांनी सुद्धा आराम मिळू शकतो. एखादे वेळी पायाचे दुखणे वाढूनते गुडघ्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे गुडघे दुखू लागतात.
अशा वेळी एक टेबल घेवून ऐक पाय जमिनीवर आणि दुसरा टेबलावर सरळ ठेवावा. पाठीत थोडं वाकून हाताने टेबलावरील पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. ही क्रिया पाच सेकंदांपर्यंत करावी. त्यानंतर पायाची अदला बदल करावी. हात पायाच्या अंगठ्यापर्यंत पोहोचले नाहीत, तरी ते शक्य तेवढे लांबावेत. पायांना नियमितपणे मालिश केल्यानेही पायांचा थकवा दूर होतो. मात्र मालिश करताना चांगल्या प्रकारचे कोल्ड क्रीम किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा. मालिशमुळे रक्तभिसरण उत्तम प्रकारे होवून स्नायूंना आराम मिळतो.
पायांवर अथवा पायांच्या बोटांना सूज आली असेल, तर कोमट पाण्यात थोडे मीठ टाकावे. त्या पाण्यात सुमारे दहा मिनटे पाय ठेवावेत. पायांची सूज आणि थकवा दोन्ही कमी होतात. पायांना थकवा जाणवू नये म्हणून खूप कडक किंवा उंच टाचांच्या चप्पल किंवा सँडल्स वापरणे टाळावे.
वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आताiTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटरपानावर फ़ॉलो करू शकता.