डासांमुळे मलेरिया,डेंग्यू, चिकनगुनिया,सारखे आजार होण्याचा धोका असतो.हे डास अंधारात, हिरव्या झाडांवर, पाण्याचे ठिकाणी आढळतात. डासांमुळे गंभीर आजार होतात काहीवेळा हे जीवघेणे देखील असू शकतात. आपल्या घराला डासांपासून मुक्त ठेवायचे असल्यास हे काही घरगुती उपाय करा जेणे करून घर डासमुक्त राहील. चला तर मग जाणून घेऊ या.
4 शरीरावर नारळाचे तेल, लवंगाचे तेल, नीलगिरीचे तेल ,पुदिन्याच्या पानांचा रस, किंवा लसणाचा रस लावल्यास किंवा हे आपल्या भोवती स्प्रे केल्यावर डास त्याचा वासाने जवळ देखील येत नाही.
7 रात्री झोपताना मच्छरदाणी वापरा, या मुळे डास चावणार नाही.
8 संध्याकाळी घराचे दारे खिडक्या बंद करा, या मुळे बाहेरून घरात डास येणार नाही आणि आपण डासांपासून सुरक्षित राहाल.
9 घरातील पाण्याचे ठिकाण कोरडे ठेवा, या मुळे डास उद्भवणार नाही.
10 कडुलिंबाचा पानाचा धूर केल्याने देखील डास घरात येणार नाही .