मधुमेहाच्या रुग्णांसाठी धण्याचे सेवन लाभदायक

शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (14:23 IST)
धणे हे भारतीय स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा मसाला आहे. धणे मसाल्याच्या रूपात अन्नाची चव वाढवतात परंतु याशिवाय हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनोल्स, बी कॅरोटीनोइड्स, लोह, कॅल्शियम, खनिजे, फायबर, मॅग्नेशियम तसेच व्हिटॅमिन ए, के आणि सी अत्यंत औषधी असतात. धणे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्यास देखील मदत करतात. याचे सेवन केल्याने रोगापासून मुक्तता होते.
 
शुगर कंट्रोल करण्यासाठी धण्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. याने कोलेस्ट्रॉल आणि चरबीची पातळी कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार मधुमेहाच्या रुग्णांसाठी धण्यांचे सेवन खूप लाभदायक असते. हे कोलेस्ट्रोल व शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतात.
 
धण्याच्या बियांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनोल्स, बी कॅरोटीनोइड्स सारख्या संयुगे रक्तातील एंटी हायपरग्लॅकायमिक, इन्सुलिन डिस्चार्जिंग तयार करतात. जे आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. 
 
मधुमेहाच्या रुग्णांनी 2 लीटर पाण्यात 10 ग्रॅम धणे रात्रभर भिजवून ठेवावे. सकाळी हे पाणी गाळून सेवन करावे. फायदा मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती