मधाचे 5 औषधी उपचार

मंगळवार, 22 जानेवारी 2019 (15:22 IST)
मध वापरण्याने आपण अनेक किरकोळ रोग टाळू शकतो. जाणून घ्या मधाचे 5 घरगुती उपचार -
 
1. आल्याच्या रसामध्ये किंवा अडूसेच्या काढ्यात मध मिसळून पिण्याने खोकल्यापासून आराम मिळतो.
 
2. पिकलेल्या आंबाच्या रसामध्ये मध मिळवून पिण्याने कावीळ सारख्या रोगात आराम मिळतो.
 
3. ज्या मुलांना साखर खाण्यावर बंदी आहे, त्यांना साखरेऐवजी मध देऊ शकता.
 
4. उलट्या होत असताना पुदिनाच्या रसाबरोबर मध दिल्याने फायदा होतो.
 
5. कोरड्या त्वचेवर मध, दुधाची साय आणि बेसन मिसळून तो पॅक लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेवर चमक येते.

वेबदुनिया वर वाचा