तुरटीचे 3 फायदेशीर घरगुती उपचार

बुधवार, 23 जानेवारी 2019 (16:15 IST)
तुरटी सर्वांच्याच घरात असते आणि नसली तरी ही बाजारात सहजपणे मिळते. तुरटी पाण्यात टाकल्यानंतर ती पाण्याला स्वच्छ करते, बर्‍याच लोकांना हे माहिती असेल, परंतु आपल्याला तुरटी इतर उपयोग आणि गुणधर्मांविषयी माहिती आहे का ? चला जाणून घ्या.
 
1. त्वचेवर जर डाग असतील तर हे काढण्यासाठी तुरटी उत्तम उपाय आहे. तुम्ही रोज नेमाने तुरटीने चेहर्‍याची मसाज करू शकता किंवा तुरटीच्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. त्वचेच चमक येईल.
 
2. जर तुम्ही दाताच्या दुखण्याने त्रस्त असाल तर तुरटी पावडर संबंधित जागेवर लावा. असे केल्याने दाताचे दुखणे दूर होण्यास मदत होईल.
 
3. शरीरावर जमलेली घाण आणि किटाणूंना दूर करण्यासाठी तुरटीच्या पाण्याने अंघोळ करणे हा एक चांगला पर्याय आहे. असे केल्याने आपल्या शरीरापासून घामाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती