हिवाळ्यात आपल्या आहार विहारच्या सवयी बदलल्यामळे वजनही वाढू शकते. तसेच या दिवसात शरीरातही अनेक बदल होतात. यामुळे आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. यासाठी योग्य आहार फायदेशीर ठरतो. थंडीत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरते. यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे. तर पाहू या थंडीत कोणता आहार योग्य ठरतो ते…..
थंडीत मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर असतात. पण त्यामुळे थंडीपासून रक्षणही होते. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येते.
या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावे.
गोड पदार्थ, शीतपेय, दुग्धजन्य पदार्थ याचं सेवनही प्रमाणातच करावं. सर्दी, खोकला असेल तर दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.