हिवाळ्यात अंजीर का खावे? फायदे जाणून नक्कीच सेवन कराल

Benefits of Figs अंजीर जेवढे चविला छान असते, तितकेच ते आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. भारतात पुणे जवळ खेड-शिवापुर गावाचे अंजीर हे जगातील सर्वात चांगले अंजीर आहे. चला जाणून घेऊ या अंजीरचे चमत्कारिक फायदे. 
 
१. अंजीरमध्ये चांगल्या प्रमाणात डायट फायबर असतात. हे पचन संस्थेला ठीक करते. यामुळे पोट पण साफ होते. यासाठी रात्री दोन ते अंजीर पाण्यात भिजुन ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते खा. याने कब्ज, एसिडिटी, गॅस, मुळव्याध तसेच ब्लोटिंगची समस्या दूर होते साधारण कब्जच्या अवस्थेत गरम दुधामध्ये वाळलेला अंजीर उकळवून सेवन केल्याने सकाळी दस्त साफ होते.
 
२. अंजीर खाल्यावर हाडे मजबूत होतात. कारण यात भरपूर मात्रा मध्ये कॅल्शिअम असते. यामुळे हाडांचे दुखणे बंद होते तसेच मानवी शरीरातील हाडे मजबूत बनतात.
 
३. अंजीरला आयरनचे एक चांगले स्त्रोत मानले जाते. शरीरात आयरनच्या कमीमुळे ऐनिमियाचा धोका वाढतो. तसेच रक्ताची कमी भासते. आणि या समस्यांना दूर ठेवण्यासाठी वाळलेल्या अंजीर पेक्षा चांगले काहीच नाही. अंजीर च्या सेवनाने शरीरात हिमोग्लोबींचा स्तर वाढतो.
 
४. अंजीर रक्तदाबाला पण नियंत्रित ठेवते. अंजीर मध्ये फायबर आणि पोटॅशिअम असते जे उच्च रक्तदाबाच्या संभावनेला कमी करते.
 
५. अंजीरचे टाकून दूध पिल्याने इम्युनिटी स्ट्रांग होते. याच्या सेवनाने बदलत्या वातावरणाचे आजार होत नाही. सर्दी, खोकला, ताप तसेच ठंडी मध्ये हाडांमध्ये आणि गूडग्यान मध्ये जास्त प्रमाणात दुखते. यासाठी रोज एक ग्लास दुधात अंजीर टाकून घेणे. यामुळे हाडांचे दुखणे येणार नाही व हाडे मजबूत होतील.
 
६. वाळलेल्या अंजीरला उकळवून चांगले बारिक करुन गळ्याला आलेल्या सुजवर किंवा गाठ यावर बांधले तर लवकर आराम मिळतो.
 
७. मधुमेह असल्यास अन्य फळांच्या तुलनेत अंजीरचे सेवन विशेष लाभकारी असते.
 
८. कुठल्याही प्रकारचा बाह्य पदार्थ पोटात गेला तर त्याला बाहेर काढण्यासाठी अंजीर अधिक मात्रा मध्ये सेवन करने उपयोगी असते. 
 
९. क्षयरोग, दमा, अस्थमा या रोगांमध्ये प्रत्येक वेळी अंजीरचे सेवन पथ्यकारक मानले जाते.
 
१०. ताजे अंजीर खाउन वरुन दूध पिणे हे अत्यंत शक्तिवर्धक तसेच वीर्यवर्धक मानले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती