World Health Day 2022 वजन कमी करण्यासाठी आहारात या 6 खाद्य पदार्थांचा समावेश करा
बुधवार, 6 एप्रिल 2022 (14:43 IST)
वजन कमी करण्यासाठी आपण किती गोष्टींचा त्याग करतो आणि किती तरी गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट करतो. कधी-कधी वजन कमी करण्याचे हे खास आहार प्रभावी ठरतात तर कधी ते फायदेशीर नसतात. पण आज आम्ही सांगत आहोत अशा काही अन्न संयोजनाबद्दल जे वजनच कमी करणार नाही तर आरोग्याशी निगडित अनेक समस्यांपासून मुक्त करतील.
1 गरम पाणी आणि मध -लिंबाचा रस -
सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू-मध मिसळून पिणे फायदेशीर आहे. दररोज ह्याचे सेवन केल्याने आपण वजनाला नियंत्रित ठेवू शकता. पोटाची चरबी नियंत्रित होण्यासह यामुळे शरीर देखील डिटॉक्स होतो.
2 ग्रीन टी आणि लिंबू -
वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी ग्रीन टी हे सर्वोत्तम पेय मानले जाते. कमी कॅलरी आणि अँटी ऑक्सीडेन्ट असणारे पेय वेगाने कॅलरी बर्न करतात आणि कमी वेळात बरेच किलो वजन कमी करतात. हे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे की दिवसातून 2 -3 कप ग्रीन टी प्यायल्याने मेटॅबॉलिझम वाढतो आणि वेगाने वजन वाढतो. हे अधिक प्रभावी बनविण्यासाठी या मध्ये व्हिटॅमिन सी ने समृद्ध ताजे लिंबाचा रस देखील घालू शकता.
3 अंडी आणि पालक -
अंडीमध्ये उच्च प्रतीचे प्रथिने आढळतात. या पौष्टिक आहाराची कृती सोपी आणि वजन कमी करण्यासाठी अनुकूल आहे. जर वजन कमी करण्याच्या मोहिमेवर आहात तर आपल्या ऑमलेट मध्ये पालक समावेश करा. एका अभ्यासानुसार, आयरन ने समृद्ध असलेल्या पालक अंडींसह वेगाने वजन कमी करण्याचे काम करतं.
4 सफरचंद आणि पीनट बटर -
सफरचंद आणि पीनट बटर हे वजन कमी करण्यासाठी अनुकूल आहार मानले जाते. पीनट बटर मध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅट असतं,जे बऱ्याच काळ उपाशी ठेवू शकतं आणि इन्स्युलिन मेटॉबॉलिझ्म देखील चांगले करतो. सफरचंद सह पीनट बटर खाल्ल्याने वजन वेगाने कमी होऊ शकतो.
5 हिरव्या पालेभाज्या आणि ऑलिव्ह ऑइल -
हिरव्या पालेभाज्या आणि सॅलड भुकेला नियंत्रित करण्यासाठी उत्तम खाद्य मानले जाते. या मध्ये ऑलिव्ह ऑइल चे समाविष्ट केल्यावर ह्याचा फायदा दुपटीने होतो. या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन केल्याने आपण वेगाने वजन कमी करू शकतो. मोनोसॅच्युरेटेड फॅट ने समृद्ध ऑलिव्ह ऑइल आणि हिरव्या पालेभाज्या मिळून भुकेला नियंत्रित करतात.
6 ओट्स आणि बॅरी -
रास्पबेरी आणि ब्लूबेरी मध्ये शरीराचे फायदेशीर आणि वेग वेगळे प्रकाराचे अँटी-ऑक्सीडेन्ट असतात.सकाळच्या आहारात ओट्स सह ह्यांचे सेवन वेगाने वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. या पदार्थांच्या समायोजनाने वजनाच्या व्यतिरिक्त इतर फायदे देखील आहे.