अधिक प्रमाणात दुधाचे सेवन करणं होऊ शकत हानिकारक

शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (07:21 IST)
प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि खनिजे इत्यादी मुबलक प्रमाणात असल्यामुळे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. डॉक्टर देखील सांगतात की दुधाचं सेवन प्रत्येकानं करावं, मग ते लहान असो किंवा मोठे. याचा सेवनाने हाडे बळकट होतातच तसेच वजन कमी करण्यात देखील हे उपयुक्त आहेत आणि रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात देखील मदत होते. 
 
जर दुधाचं सेवन योग्य प्रमाणात केले तर ते फायदेशीर आहे नाही तर याचे अधिक सेवन केल्यानं हे शरीरास अनेक समस्यांना उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या की जास्त प्रमाणात दूध पिण्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात.
 
* पचनाशी निगडित समस्या- 
कोणत्याही गोष्टीचे अती सेवन केल्यानं हानीच होते, मग ते दूधच का नसो. जास्त प्रमाणात दुधाचं सेवन पचनाशी निगडित समस्या उद्भवू शकतात. बऱ्याचदा असं होत की जास्त प्रमाणात दुधाचं सेवन केल्यानं पोट फुगतं, अफरा लागतो, गॅस इत्यादींचा त्रास होऊ लागतो. दुधाचं सेवन तेवढेच करावं ज्यामुळे आपल्या काही त्रास होणार नाही.
 
* थकवा आणि सुस्तपणा- 
जास्त दुधाचं सेवन केल्यानं आपल्याला मळमळ, अस्वस्थता, थकवा आणि सुस्तपणा होऊ शकतं. या शिवाय डेयरीच्या दुधात ए1 केसीन असतं, जे आतड्यांमध्ये सूज येण्यासह बॅक्टेरियाला वाढवतं. म्हणून दुधाचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं.
 
* त्वचेच्या समस्या- 
दुधाचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं आपल्या त्वचा किंवा इतर भागावर ऍलर्जी होऊ शकते, पुरळ येऊ शकतात. जर आपल्याला नेहमी मुरुमांचा त्रास होत असल्यास आपल्याला आपल्या आहाराला तपासून बघावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
* हृदयाशी निगडित समस्या - 
दिवसभरात तीन ग्लास पेक्षा जास्त दूध घेतल्यानं हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. असं अनेक संशोधनात आढळून आले आहे. म्हणूनच, आपल्याला किती प्रमाणात दूध घ्यावयाचे आहे या बद्दल आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं चांगले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती