आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

बुधवार, 22 एप्रिल 2020 (07:10 IST)
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका करतात जेणेकरून त्यांना लाभ मिळण्याच्याऐवजी काही नुकसानच होतात. दुधाचे सेवनाचे करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.
 
1 पुष्कळ लोकांची सवय असते जेवणानंतर दूध पिण्याची. असे करू नये. दूध पचायला जड असते. असे केल्यास आपणास जडपणा जाणवतो आणि पचन तंत्रात बिघाड होऊ शकतो.
2 जेवल्यानंतर दूध पिण्याची सवय असल्यास जेवण कमी करावं. नाहीतर आपल्या पचनतंत्रात बिघाड होऊ शकतो. शक्यतो रात्री असे करू नका.
3 आंबट वस्तूंचे सेवन जेवण्याचा अर्ध्या तासापूर्वीच. किंवा जेवण्याचा अर्ध्या तासानंतर करावे. असे नाही केले तर आंबट ढेकराच्या त्रासाने वैतागाल.
4 कांदा आणि वांग्याच्या सोबत दुधाचे सेवन करू नये. असे केल्याने त्याच्यात रासायनिक क्रिया होऊन त्वचेचे रोग उद्भवतात. त्यासाठी ह्याचा सेवनामध्ये काहीसे अंतर राखावे.
5 मांसाहार सोबत दूध घेण्यास टाळावे. त्वचेवर पांढऱ्या डागाची समस्या उद्भवू शकते. मास आणि मासे आणि दुधात प्रथिने असतात. त्यामुळे पचनतंत्रात बिघाड होऊ शकते.
6 आपण शक्ती आणि पोषण मिळण्यासाठी दुधाचे सेवन करत असाल तर गायीच्या दुधाचा वापर करावा आणि जर आपणास वजन वाढवायचे असेल तर म्हशीच्या दुधाचे सेवन करावे. पण लक्षात असू द्यावे की म्हशीच्या दुधाने कफ वाढते.
7 थंडगार दूध पिऊ नये. साखरेचाही वापर कमी करावा. थंड दूध पचनास जड असते. थंड दुधाचा वापर केल्याने पोटात गॅस होतात. साखर पोषक द्रव्यास नष्ट करते ज्यामुळे पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती