स्नायूंमधील ताण किंवा पीळ दूर करण्यासाठी हे उपाय अवलंबवा

मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (13:00 IST)
बहुतेक लोक आपल्या आयुष्यात स्नायूंमध्ये पीळ आल्याचा अनुभव घेतात.आपण देखील हे अनुभवले असणार. हा त्रास एकाएकी उद्भवतो. पीळ किंवा मुरडा येण्याचा त्रास पोटापासून स्नायूंमध्ये हात आणि पाय कुठेही आणि कधी ही होऊ शकतो. त्यामुळे अचानक वेदना होते आणि कधी -कधी सूज येते.जर वेळीच ह्यावर उपाय केले नाही किंवा ह्याची काळजी घेतली नाही तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते.असं होऊ नये या साठी काही घरगुती उपाय अवलंबवा. जेणे करून या त्रासापासून मुक्त होऊ शकाल.  
 
1 सैंधव मीठ -
सैंधव मीठ स्नायूंच्या ताणच्या समस्येसाठी फायदेशीर आहे. या मध्ये मॅग्नेशियम असत,जे स्नायूंना आराम देऊन ताण किंवा पीळ येण्याचा त्रास दूर करतो. या साठी आपण कोमट पाण्यात सैंधव मीठ घालून त्या पाण्याने अंघोळ करा.परंतु हे लक्षात ठेवा की अर्ध्या तासापेक्षा जास्त या पाण्याने अंघोळ करू नका, अन्यथा ह्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
 
2 जास्त पाणी प्यावं -
पाण्याची कमतरता हे देखील कारण स्नायूंना पीळ किंवा ताण होण्याची समस्येला कारणीभूत असू शकत. पुरेसं पाणी पिणं या समस्येवर चांगला उपाय आहे. या साठी आपण वेळोवेळी पाणी पीत राहावं, कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्याशी निगडित इतर समस्या उद्भवू शकतात.
 
3 लवंगाच्या तेलाचा वापर-
तज्ज्ञ सांगतात की लवंगाच्या तेलात सूज कमी करण्याचे गुणधर्म आढळतात, जे स्नायूंचे ताण आणि त्यामध्ये होणारी पीळ कमी करण्यात मदत करतात. स्नायूंचा पीळ कमी करण्यासाठी लवंगाच्या तेलाला कोमट करा आणि बाधित जागी लावा नंतर 5 ते 10 मिनिटे हळुवार हाताने मसाज करा. या मुळे आराम मिळेल.  
 
4 संतुलित आहार घ्या- 
आपल्या आहारात व्हिटॅमिन पासून पोटॅशियम,कॅल्शियम,आणि मॅग्नेशियम समाविष्ट करा, कारण हे सर्व पोषक घटक स्नायुंच्या वेदनेला आणि पीळ होण्याला कमी करण्यात मदत करतात आणि हाडे बळकट करतात. आपण पालक,मुळा,पान कोबी सारख्या हिरव्या भाज्यांव्यतिरिक्त सोयाबीन, मासे आणि रताळ्या सारख्या पदार्थांचे सेवन करावे. या मुळे आपल्याला फायदा होईल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती