* पुरेसं पाणी प्या. दिवसभरात किमान दोन लीटर पाणी प्यायला हवं. बाहेर असताना नारळ पाणी, फळांचे रस, लिंबू पाणी यांचं सेवन करत राहा.
* मद्य तसंच सोड्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. उन्हात फिरून घरी आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करा. थंड पाण्यामुळे रक्तप्रवाह सुधारायला मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात मळमळल्यासारखं वाटतं, त्वचा काळवंडते, पुळ्या येतात. हे टाळण्यासाठी दररोज दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करा.
* दुपारी बारा ते तीनदरम्यान उन्हात फिरणं टाळा. या काळात उन्हाची तीव्रता प्रचंड असते. बाहेरची कामं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा. डोकेदुखी, मळमळ, चक्कर असा त्रास जाणवू लागला तर तातडीने डॉक्टरांकडे जा. पाणी प्या. कुणी चक्कर येऊन पडलं तर अंगावर थंड पाणी शिंपडा, सावलीत झोपवा आणि डॉक्टरांकडे न्या.