स्मार्टफोनमुळे जग बदलंय. आज कुणीही फ्री बसलेले आढळतं नाही काही सेकंद जरी मिळाले तरी लोकं आपला स्मार्टफोन काढून त्यात मग्न होऊन जातात. सतत डोळ्यासमोर स्मार्टफोन असल्यामुळे याचे वाईट परिणाम डोळ्यावर दिसून येत आहे. आपल्या लाइफस्टाइलमुळे कोणत्याही परिस्थिीतीत आता या डिव्हाइसेसपासून लांब राहणे अशक्य झाले आहे. पण यामुळे काय नुकसान आहे बघा आणि कशा प्रकारे त्यापासून वाचता येईल हे देखील जाणून घ्या:
डोळ्याचे विकार
स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवल्यामुळे डोळ्याचे विकार दिसून येताय. कमी वयात चष्मा लागणे, नजर कमजोर होणे, अंधुक दिसणे, डोळ्यासमोर अंधारी येणे या व्यतिरिक्त एका शोधाप्रमाणे स्मार्टफोनमुळे वयाच्या पन्नासव्या वर्षापर्यंत डोळे गमावावे लागण्याची स्थिती निर्माण होत आहे.
बचावाचे उपाय
अशात बचावासाठी आपण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या सेटिंगमध्ये जाऊन ब्ल्यू लाइट ऑन करू शकता. डिस्प्लेवर हाय-क्वालिटी स्क्रीन प्रोटेक्टर्स वापरू शकता. सतत लॅपटॉप/कॉम्प्यूटरवर काम करत असाल तर वेळोवेळी आय चॅकअप करत राहावे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आय ड्रॉप्स वापरावे. काम करताना ब्रेक घेऊन डोळे गार पाण्याने धुवावे. ब्ल्यू लाइट आणि यूव्ही फिल्टर चष्मा वापरावा.