दिवसभर काम, काम आणि फक्त काम करणारे अनेक जण असतात. त्या कामापुढे मग त्यांना कशाचेही भान नसते. याचा परिणाम त्यांच्या केवळ जीवनशैलीवरच होत नाही तर आरोग्यावरही होतो. विशेष म्हणजे सततचे काम आणि दररोजचे ताण देणारे काम यामुळे एकप्रकारे थकवा येतो. हा थकवा दूर करण्यासाठी मग नाना प्रकारे प्रयत्न केले जातात. असेच काही योग्य रीत्या केलेले उपाय आणि प्रयत्न थकवा दूर करू शकतात. असे काही उपाय –
जेवणावर तुमच्या शरीराची शक्ती केंद्रित असते. व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफीनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
शरीराला मॉलिश केल्यानेसुद्धा आळस दूर होतो.
थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीराची ऊर्जा संपते व थकवा येतो. हा व्यायाम करून पहा : दीर्घ श्वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा व नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा.
रंगांचासुद्धा जीवनावर प्रभाव पडतो. नारंगी, लाल, पिवळा आणि डार्क हिरवा रंग मनाला तजेला देतात. त्यामुळे प्रसन्न वाटते.